अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्यांना असलेल्या फाशीच्या शिक्षेची कार्यवाही त्वरित व्हायला हवी !

संभाजीनगर – मंदिरातून घराकडे निघालेल्या ४ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला. वाळूजजवळील पंढरपूर येथे रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी वाळूज एम्.आय.डी.सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या १ घंट्यात आरोपी संभाजी धवारे (वय ३५ वर्षे) याला अटक केली आहे. आरोपी संभाजी धवारे एका आस्थापनात सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे.
पीडित बालिकेचे घर पंढरपूर येथील एका मंदिराच्या मागेच आहे. याच मंदिरात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रतिदिन हरिपाठ असतो. नेहमीप्रमाणे ही बालिका हरिपाठ चालू झाल्यावर मंदिरात गेली होती, तर तिची आई घरीच होती; मात्र ती मंदिरात धिंगाणा घालत असल्याने तिच्या बहिणीने तिला घरी पाठवून दिले. ती मंदिराच्या बाहेर पडली, त्याच वेळी आरोपी आस्थापनातून त्याच रस्त्याने घरी परतत होता. अंधाराचा अपलाभ घेत त्याने बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराची माहिती बालिकेने आई-वडिलांना सांगितली.
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !