मेवात येथे झालेल्‍या आक्रमणाचा विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून निषेध !

इचलकरंजी येथे आंदोलन करतांना विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्‍हापूर – श्रावण सोमवारच्‍या निमित्ताने प्रतिवर्षी निघणार्‍या ब्रजमंडल यात्रेवर ३१ जुलैला जिहादी मुसलमानांनी आक्रमण केले. या प्रसंगी गाड्या पेटवण्‍यात आल्‍या, दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला. यात एका सैनिकासमवेत बजरंग दलाच्‍या २ कार्यकर्त्‍यांचा मृत्‍यू झाला. तरी मेवात येथे झालेल्‍या घटनेच्‍या निषेधार्थ विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या बाहेर निदर्शने करण्‍यात आली. तीव्र निषेध व्‍यक्‍त करण्‍यात आला. या प्रसंगी अधिवक्‍ता सुधीर-वंदूरकर जोशी म्‍हणाले, ‘‘हा सुनियोजित असा मोठा देशविरोधी कट आहे. अशा प्रकारे वारंवार हिंदूंच्‍या धार्मिक यात्रेवर जिहादी मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत आणि देशात जातीय दंगे भडकवण्‍याचा कट आहे. तरी मेवात येथील आक्रमणाचे सखोल अन्‍वेषण होऊन हा खटला जलदगती न्‍यायालयात चालवून दोषींना तात्‍काळ शासन करण्‍यात यावे.’’ याच मागणीसाठी इचलकरंजी येथेही निदर्शने करण्‍यात आली.