पावसाळी अधिवेशनाच्या बातम्या वाचण्यासाठी हा क्यू.आर्. कोड वापरा !

पावसाळी अधिवेशनानिमित्त ‘सनातन प्रभात’च्या विशेष प्रतिनिधींना विविध मंत्री आणि आमदार यांनी दिलेल्या मुलाखतींचे व्हिडिओ पहाण्यासाठी

शिरूर (पुणे) येथे कत्तलीसाठी नेणार्‍या २२ वासरांची सुटका !

जर्सी गायीच्या ३ ते ४ दिवसांच्या २२ वासरांची कत्तलीसाठी मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातून वाहतूक करण्यात येत होती. विकास शेडगे या गाडीचा पाठलाग करत होते. त्यांनी याविषयी मांडवगण फराटा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत सापळा लावून गाडी पकडली आणि सर्व वासरांची सुटका केली.

इचलकरंजीत मुसलमान विद्यार्थ्यांच्या पोषाखास हिंदु विद्यार्थ्यांकडून भगवी पट्टी घालून प्रत्युत्तर

कोल्हापूर शहरातील एका महाविद्यालयात भगवी पट्टी घालणार्‍या विद्यार्थ्यास वर्गाबाहेर काढल्याची घटना ताजी असतांनाच इचलकरंजी येथेही या प्रकाराची पुनरावृत्ती झाली.

मणीपूरमध्ये आतंकवादी संघटनांचा शिरकाव : मणीपूरमधील स्थिती बिघडवण्याचे पाकचे षड्यंत्र !

पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांनी मणीपूरमधील वातावरण बिघडवण्याचे षड्यंत्र रचले आहे. पाकिस्तान समर्थित आतंकवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ यांनी मणीपूरमधील वादानंतर तेथील एका समुदायाला उघड पाठिंबा घोषित केला.

पुण्यात पडकलेल्या २ धर्मांध आतंकवाद्यांचा बाँबस्फोट करण्याचा डाव उधळला !

यापूर्वी १० जुलै २०१४ या दिवशी शहराच्या मध्यभागातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकीत स्फोटके ठेवून स्फोट घडवण्यात आल्याची घटना घडली होती. याविषयी एन्.आय.ए., ए.टी.एस्., तसेच पुणे पोलीस यांकडून आतंकवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे.

संभाव्य आपत्तीत स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सिद्ध ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

संभाव्य आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या अनुषंगाने स्थानिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. पावसाचा वाढता जोर पहाता स्थानिकांनीही याविषयी तात्काळ माहिती द्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे.

पंढरपूर येथील कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या तुळशी वृंदावनातील संतांच्या मंदिरांचे चौथरे निकृष्ट दर्जाचे !

तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याच्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात फळपीक विम्याची साडेचौदा सहस्र बोगस प्रकरणे !

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ सहस्र ४१३ विमा अर्जदारांपैकी २ सहस्र ७१३ बोगस विमा प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यात एकूण ७८ सहस्र ४३० विमा अर्जदारांपैकी १९ सहस्र ९७२ अर्जांची पडताळणी झाली असून १ सहस्र १४५ बोगस विमा प्रकरणे आढळून आली आहेत.

शासकीय, तसेच खासगी रक्तपेढ्यांतील रक्ताच्या दरात वाढ !

शासकीय रक्तपेढ्यांतून विकत मिळणार्‍या प्रतियुनिट रक्ताकरता पूर्वी ८५० रुपये द्यावे लागायचे. ते यापुढे १ सहस्र १०० रुपये देऊन विकत घ्यावे लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती, बागायती यांसह खासगी आणि शासकीय संपत्तीची हानी झाली आहे.