शिरूर (पुणे) येथे कत्तलीसाठी नेणार्‍या २२ वासरांची सुटका !

प्रतीकात्मक छायाचित्र

शिरूर (जिल्हा पुणे) –  जर्सी गायीच्या ३ ते ४ दिवसांच्या २२ वासरांची कत्तलीसाठी मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातून वाहतूक करण्यात येत होती. विकास शेडगे या गाडीचा पाठलाग करत होते. त्यांनी याविषयी मांडवगण फराटा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत सापळा लावून गाडी पकडली आणि सर्व वासरांची सुटका केली. या प्रकरणी विकास शेडगे यांनी तक्रार प्रविष्ट केली असून ओंकार सायकर यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

वासरांनाही न सोडणारे क्रूर कसाई ! गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी गोवंश हत्‍या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून सर्व अवैध पशूवधगृहे बंद व्हायला हवीत !