मणीपूरमध्ये आतंकवादी संघटनांचा शिरकाव : मणीपूरमधील स्थिती बिघडवण्याचे पाकचे षड्यंत्र !

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांनी मणीपूरमधील वातावरण बिघडवण्याचे षड्यंत्र रचले आहे. पाकिस्तान समर्थित आतंकवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ यांनी मणीपूरमधील वादानंतर तेथील एका समुदायाला उघड पाठिंबा घोषित केला. या आतंकवादी संघटनांनी तरुणांना लक्ष्य करण्यास चालू केले आहे. याविषयी सतर्क राहून गुप्तचर यंत्रणांनी मणीपूरमधील दक्षता वाढवली आहे. मणीपूरमध्ये उपस्थित असलेल्या संशयास्पद लोकांना शोधण्याची मोहीमही चालू केली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’चा आतंकवादी तनवीर अहमद याने धर्माच्या आधारे कट पुढे नेण्यास चालू केले. तनवीर अहमद मणीपूरमधील कुकी आणि मैतेई यांच्यामध्ये फूट पाडण्याचा कट रचल्याचे या सूत्रांनी सांगितले. मणीपूरमध्ये चालू असलेल्या वादामागे परकीय शक्ती आणि त्यांच्या सहयोगी आतंकवादी संघटना यांचा हात असल्याचे संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे.