पॅरोलवर फरार असणारा गोध्रा हत्याकांडातील दोषी सत्तार याला पोलिसांनी केली अटक !

पॅरोलवर असणारा दोषी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक कशी काय करतो ? यासाठी उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या अभिषेक पूजेच्‍या दरवाढीचा निर्णय रहित करावा !

निवेदनात म्‍हटले आहे की, मंदिर प्रशासनाने अभिषेक दरवाढ ५० रुपयांवरून थेट ५०० रुपयांवर करण्‍याचा निर्णय घेतला. तूर्तास या निर्णयाला स्‍थगिती दिली आहे.

पुण्‍यात अटक केलेल्‍या आतंकवाद्यांकडून ‘ड्रोन कॅमेरे’, तसेच विध्‍वंसक कारवायांसाठी वापरण्‍यात येणारी पावडर जप्‍त !

या दोघांना पकडल्‍यानंतर राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.), देहली आणि जयपूर येथील अन्‍वेषण पथके, तसेच महाराष्‍ट्र आतंकवादविरोधी पथक पुण्‍यात पोचले आहे. त्‍यांनीही या गुन्‍ह्याचे समांतर अन्‍वेषण चालू केले आहे.

प्रेमळ, सकारात्‍मक आणि कर्करोगासारख्‍या दुर्धर आजारातही तळमळीने साधना करणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

‘वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांना मी वर्ष १९९८ पासून ओळखतो. आम्‍ही जिल्‍ह्यातील विज्ञापनांचे संकलन आणि इतर विविध सेवा एकत्र केल्‍या आहेत. मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

‘तहलका’चे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना २ कोटी रुपयांचा दंड !

मानहानीच्या प्रकरणात २२ वर्षांनंतर न्याय मिळणे, याचा अर्थ ‘इतकी वर्षे व्यक्तीची मानहानी होत रहाणे’, असाच होतो, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना हप्ता न दिल्याने त्यांनी हत्या केल्याचा भाजपचा आरोप

मिझोराममधून मैतेई या हिंदु समाजाचे पलायन !

मणीपूरमधील घटनेवरून ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने दिलेल्या धमकीचा परिणाम !

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

जिल्हा न्यायालयाने येत्या ४ ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. मुसलमान पक्षाने या सर्वेक्षणाला विरोध करतांना ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ या कायद्याचा आधार घेतला आहे.

 महाविद्यालयाच्या पाद्य्राला अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक !

एरव्ही हिंदूंच्या साधू-संतांवर केल्या जाणार्‍या खोट्या आरोपांवरून आकाशपाताळ एक करून हिंदु धर्मावरच चिखलफेक करणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा !

१५ दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास ‘रास्ता रोखा’आंदोलन

ग्रामस्थांनीही वारंवार तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. भविष्यात अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यासाठी उत्तरदायी रहातील.