श्री तुळजाभवानीदेवीच्‍या अभिषेक पूजेच्‍या दरवाढीचा निर्णय रहित करावा !

जनहित संघटनेची मागणी

सिद्धेश्‍वर इंतुले यांना निवेदन देतांना जनहित संघटनेचे कार्यकर्ते

तुळजापूर (जिल्‍हा धाराशिव), २३ जुलै (वार्ता.) – श्री तुळजाभवानीदेवीच्‍या मंदिर संस्‍थानने अभिषेक पूजेसाठी दरवाढ करण्‍याचा घेतलेला निर्णय रहित करण्‍यात यावा, अशी मागणी जनहित संघटनेच्‍या वतीने मंदिर संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली. हे निवेदन लेखापाल सिद्धेश्‍वर इंतुले यांच्‍याकडे सादर करण्‍यात आले.

निवेदनात म्‍हटले आहे की, मंदिर प्रशासनाने अभिषेक दरवाढ ५० रुपयांवरून थेट ५०० रुपयांवर करण्‍याचा निर्णय घेतला. तूर्तास या निर्णयाला स्‍थगिती दिली आहे. ही दरवाढ म्‍हणजे भक्‍तांच्‍या भावनेशी खेळ चालू असल्‍याचे दिसून येत आहे. देऊळ कवायत कलम (१३) नुसार धार्मिकतेत हस्‍तक्षेप असून श्री तुळजाभवानी देवस्‍थान हे कोणत्‍याही प्रकारचे औद्योगिक वसाहत नसून हे धार्मिक स्‍थळ आहे. याचे भान ठेवून ठराव घ्‍यावेत आणि घेतलेला अभिषेक दरवाढीचा निर्णय रहित करावा. अन्‍यथा गावभर आंदोलन उभे केले जाईल.