छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा !  – हिंदु जनजागृती समितीचे आजरा आणि चंदगड येथे निवेदन

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन आजरा अन् चंदगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले.

दुर्गम भागामुळे बचाव पथकाचे काम अधिक वेळ चालेल ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुर्घटनेत २५ ते २८ जण बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ७० नागरिक सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. २१ जण घायाळ असून त्यांतील १७ जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार चालू आहेत, तर ६ जणांना पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार चालू आहे. आतापर्यंत १० लोकांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.

कर्णावती (गुजरात) येथे भीषण अपघातात ९ जण ठार, तर १५ जर घायाळ

मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एक गृहरक्षक दलाचा सैनिक यांचा समावेश आहे.

दीप अमावास्येच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दीपपूजन !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ, मारुति चौक येथे दीप अमावास्येच्या निमित्ताने दीपपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

मणीपूरमधील संतापजनक घटनेत जमावाने २ महिलांना विवस्त्र करून काढली धिंड !

२ मासांपूर्वीच्या या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर एकाला अटक
सामूहिक बलात्कार झाल्याचाही गुन्हा नोंद !

#Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !

कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ कधी स्थापन होणार ?

गोवा : ‘स्मार्ट सिटी’च्या कामांची सभागृह समितीच्या माध्यमातून अन्वेषण करण्याची विरोधकांची मागणी

‘‘या प्रकरणात काहीतरी चुकले आहे आणि ही चूक सुधारली जाणार आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकरणी अन्वेषण करण्यास प्रारंभ केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी विविध खात्यांतर्गत समन्वयामध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक आहे.’’ – मुख्यमंत्री

गोवा : पीडित मुलीची ‘इन कॅमेरा’ जबानी नोंदवण्यास प्रारंभ

या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यापुढे सुनावणी चालू आहे. या प्रकरणी अनेकांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. अभियोग पक्षाच्या वतीने या प्रकरणी सरकारी अधिवक्ता व्ही.जी. कोस्ता बाजू मांडत आहेत.

गोव्यात प्रत्येक मासाला बलात्काराची ७ प्रकरणे नोंद

मागील ६ मासांत महिलांवरील अत्याचारासंबंधी ११९ गुन्हे नोंद झालेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

वर्ष २०२४ पासून गोव्यातील सर्व नवीन पर्यटन वाहने विजेवर चालणारी असणे बंधनकारक करणार ! – मुख्यमंत्री

नीती आयोगाच्या वतीने आयोजित आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया अन् एशियन डेव्हलपमेंट बँकद्वारे समर्थित ‘पॉलिसी सपोर्ट अँड एनेबलर्स टू एक्सेलरेट इंडियाज इलेक्ट्रिक मोबिलिटी’, या शीर्षकाच्या एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.