गोव्यात प्रत्येक मासाला बलात्काराची ७ प्रकरणे नोंद

६ मासांत महिलांवरील अत्याचारासंबंधी ११९ गुन्हे नोंद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १९ जुलै (वार्ता.) – राज्यात चालू वर्षी प्रत्येक मासाला बलात्काराच्या ७  घटनांची नोंद झालेली आहे. मागील ६ मासांत महिलांवरील अत्याचारासंबंधी ११९ गुन्हे नोंद झालेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

ते पुढे म्हणाले,

‘‘राज्यात जानेवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत बलात्काराची ४३ प्रकरणे नोंद झालेली आहेत आणि यातील २० प्रकरणांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. याच कालावधीत महिलांवरील अत्याचारासंबंधी एकूण ११९ गुन्हे नोंद झालेले आहेत. यामध्ये ४३ बलात्कार, ४० विनयभंग, २४ अपहरण, १० छेडछाड करणे आणि २ महिलांची तस्करी या गुन्ह्यांचा समावेश आहे.’’