पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ठार मारण्याचे विधान करणार्‍या मौलानावर कायदेशीर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ?

आजगाव येथे चालणार्‍या वेश्या व्यवसायावर वेंगुर्ला पोलिसांची धाड

शांत आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनैतिक व्यवसायांत होणारी वाढ ही जिल्ह्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी  !

गोवा : ६ वर्षांच्या कालावधीत आमदारांच्या आजारपणावर सरकारकडून १५ कोटी रुपये खर्च !

आमदारांना आणि कुटुंबाला वैद्यकीय देयकांचे परतावा (रिफंड) दिला जातो. वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत अनेक आमदारांना वैद्यकीय देयके भरण्यासाठी १५ कोटी १५ लाख रुपये खर्च केले.

वादग्रस्त ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांच्याकडून क्षमायाचना ! 

‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटात अयोग्य संवादांचे लिखाण केल्याच्या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी क्षमायाचना केली आहे. मुंतशीर यांनी आरंभी श्री हमुमंतांच्या मुखी घातलेल्या वादग्रस्त संवादाचे ठामपणे समर्थन केले होते.

गोव्यात ५० इंच पावसाचा टप्पा पार : जनजीवन विस्कळीत

राज्यात दरड कोसळणे, झाडे पडणे, घर आणि इतर संसाधने यांची हानी होणे असे प्रकार चालूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने पुढील ६ दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची (ऑरेंज अलर्ट) चेतावणी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

या पावसामुळे वीजवितरण यंत्रणा काही ठिकाणी कोलमडली आहे, तसेच झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी घरे, गोठे यांसह वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत.

देशातील ७ राज्यांत पूरसदृश परिस्थिती ! 

देशातील ७ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तराखंड, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ आणि यनागालँड या राज्यांचा समावेश आहे.

अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित !

दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित करण्यात आली.

कर्नाटक सरकारकडून कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी १ सहस्र कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद

म्हादई पाणी तंटा लवादाने कळसा आणि भंडुरा नाला पेयजल प्रकल्पासाठी पाणी वापरण्यास यापूर्वीच अनुमती दिलेली आहे. पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार !

पू‍र्वीचे राजे आणि आजचे शासनकर्ते यांच्यातील भेद !

‘पूर्वी राजाला प्रजा पुत्रवत वाटत असे. आता लोकशाहीत ‘शासनकर्ते प्रजेला लुबाडण्यासाठी आहेत’, असे वाटते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले