श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्या दिवशीही स्थगित करण्यात आली. मुसळधार पावसानंतरही आतापर्यंत ८४ सहस्र ७६८ भाविकांनी पवित्र अमरनाथाचे दर्शन घेतले आहे. पावसामुळे येथे काही ठिकाणी भुस्खलन झाल्याने काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.