एका आरोपीसह ३ महिला कह्यात
वेंगुर्ला – सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे ७ जुलै या दिवशी पोलिसांनी धाड टाकून वेश्या व्यवसाय चालवणार्यासह अन्य राज्यातील ३ महिला अशा एकूण ४ जणांना कह्यात घेतले. वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आजगाव येथे वेश्या व्यवसायावर धाड टाकली. या वेळी केलेल्या तपासणीत तेथे वेश्याव्यवसाय चालत असल्याचे आढळून आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मद्याची अवैध विक्री, मटका, जुगार, अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री यांसारखे अनेक अनैतिक व्यवसाय चालू असल्याचे वेळोवेळी अनेक घटनांतून उघड झाले आहे. यात भर म्हणून आता जिल्ह्यात वेश्या व्यवसायही चालू असल्याचे आजगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईमुळे उघड झाले आले आहे. (शांत आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनैतिक व्यवसायांत होणारी वाढ ही जिल्ह्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी ! – संपादक)