![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2023/07/31231413/worli-sea-link_700.jpg)
मुंबर्ई – वांद्रे-वरळी सागरी लिंकवरून एका व्यक्तीने आपली गाडी तेथे थांबवून समुद्रात उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांनी शोध मोहीम चालू केली आहे. या व्यक्तीचे नाव, तसेच तिने समुद्रात उडी मारल्यामागील कारण यांचा शोध पोलिसांकडून चालू आहे.