विटा (जिल्हा सांगली) – संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने विटा (जिल्हा सांगली) येथे प्रशांत आणि स्वाती कांबळे या दांपत्याने ‘फेसबुक लाईव्ह’ करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या दोघांवर एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून यात एका प्रशासकीय अधिकार्याने अडवणूक केल्याने हे काम होत नसल्याचा आरोप केला आहे. या प्रशासकीय अधिकार्याने ‘हा रस्ता हा विषय संबंधित अधिकार्याच्या संदर्भातील विषय नाही. या संदर्भातील निर्णय काही दिवसांपूर्वीच झाला होता’,
असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले आहे.