मुंबई – मुंबई अग्नीशमन दलाच्या ताफ्यात लवकरच आणखी दोन यंत्रमानव (फायर रोबो) भरती होणार आहेत. जेथे मनुष्य पोचू शकत नाही, अशा अत्यंत धोकादायक ठिकाणी ‘रिमोट कंट्रोल’ने या यंत्रमानवांच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम करता येईल. त्यासाठी महापालिका साडेसात कोटी खर्च करणार आहे. या यंत्रमानवांचा वापर पूर्व आणि पश्चिम उपनगरांत करण्यात येणार आहे. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा सागरी किनारा मार्ग, तसेच मेट्रोचे बोगदे येथे आग लागल्यास तिथेही त्यांचा वापर होईल.