कागल उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवेदन

कागल (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत ‘आम्ही ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असे वक्तव्य करून भारताच्या राष्ट्रीय गीताचा घोर अवमान केला आहे. तरी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करणारे आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व त्वरित रहित करावे, या मागणीचे निवेदन उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कागल तहसीलदार इंगळे यांना देण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर, बजरंग बलाचे श्री. विनायक आवळे, दीपक भोपळे, उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सर्वश्री राजेंद्र साळोखे, लक्ष्मण लाड, मधुकर भोसले, दिग्विजय पाटील, विकास चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.

पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !