लव्‍ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

लव्‍ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

लागोपाठ दिलेल्‍या इंजेक्‍शनमुळे मुलीचा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप !

नितीन कांबळे यांची मुलगी श्रद्धा हिला उलट्या होत असल्‍याने उपचारासाठी सनलाईट रुग्‍णालयात १३ जून या दिवशी भरती केले. तिला सलाईनमधून इंजेक्‍शन देण्‍यात आले. त्‍यानंतर श्रद्धा बेशुद्ध पडून निपचित झाली.

सातारा जिल्‍हा परिषदेत ‘प्रभारी’च ‘कारभारी’ !

पदे रिक्‍त का ठेवली जातात ? यामुळे जनतेला सुविधा मिळत नाहीत, तसेच आहे त्‍यांना अधिक काम करावे लागते, याला कोण उत्तरदायी ? पदे रिक्‍त ठेवण्‍यास कारणीभूत असणार्‍यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

अतिक्रमणांच्‍या संदर्भात कायदेशीर सूत्रे तपासूनच पुढील निर्णय घेणार ! – जितेंद्र दुडी

जिल्‍हाधिकारी दुडी पुढे म्‍हणाले की, जिल्‍हाधिकारी जयवंशी यांनी राबवलेल्‍या अनेक उपक्रमांमुळे जिल्‍ह्याचा विकास झाला आहे. जिल्‍हाधिकारी जयवंशी यांनी चालू केलेले उपक्रम आणि चांगल्‍या परंपरा कायम ठेवल्‍या जातील.

बंगालमध्‍ये आता राष्‍ट्रपती राजवटच हवी !

बंगालच्‍या दक्षिण परगणा (बंगाल) जिल्‍ह्यातील कैनिंग शहरात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्‍या २ गटांमध्‍ये १०० ठिकाणी झालेल्‍या हिंसाचारात कार्यकर्त्‍यांनी एकमेकांवर बाँब फेकले.

विदेशात ख्रिस्‍ती पंथाची होत असलेली दुर्दशा आणि त्‍याचा भारतात वाढत असलेला प्रभाव

पृथ्‍वीच्‍या दक्षिण भागात श्रद्धाळू आणि चर्चशी जोडलेले लोक यांच्‍या संख्‍येत विलक्षण वृद्धी झाली आहे. भारतासारख्‍या अन्‍य देशांना ख्रिस्‍त्‍यांचे ‘डम्‍प यार्ड’ (कचरा फेकण्‍याचे क्षेत्र) बनवले जात आहे. एक प्रसिद्ध ख्रिस्‍ती धर्मोपदेशक सांगत आहेत की, पृथ्‍वीच्‍या दक्षिण भागामध्‍ये चर्च जलद गतीने विकसित होत आहेत. त्‍यामुळे वर्ष २०६० पर्यंत पृथ्‍वीच्‍या दक्षिण क्षेत्रात ख्रिस्‍ती लोकांची संख्‍या ३४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढत जाईल.

भ्रष्‍टाचारमुक्‍त राष्‍ट्रासाठी लोकपाल कायदा !

‘१८ व्‍या शतकात सर्वप्रथम स्‍वीडनमध्‍ये लोकपाल ही संकल्‍पना उदयास आली. एक अशी व्‍यवस्‍था जी न्‍यायमंडळे आणि शासकीय संस्‍था यांच्‍या व्‍यतिरिक्‍त भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधात कृती करील.

झारखंडमधील वाढता जिहादी उपद्रव आणि त्‍यावरील उपाय

बिहार राज्‍याचा एक भूभाग १५ नोव्‍हेंबर २००० या दिवशी वेगळा करून झारखंड हे घटकराज्‍य अस्‍तित्‍वात आले. त्‍याला ५ मासांनी २३ वर्षे होतील. या कालखंडात बांगलादेशातील घुसखोरांची संख्‍या वेगाने वाढत आहे. ‘घुसखोर हे भारतात येण्‍याआधीच त्‍यांची ओळखपत्रे सिद्ध केली जात आहेत’, अशी बातमी ‘टीव्‍ही ९’च्‍या हिंदी वृत्तवाहिनीवरून देण्‍यात आली.

बनावट बियाणे !

पेरणीच्‍या हंगामात अनेकदा शेतकर्‍यांना बनावट बियाणे देऊन त्‍यांची फसवणूक करण्‍यात येत असल्‍याच्‍या अनेक घटना समोर येत आहेत. कापसाच्‍या बियाण्‍यांच्‍या एका (४७५ ग्रॅम) पाकिटाचे मूल्‍य बाजारात ८३० ते ८५० रुपये (वाणानुसार मूल्‍य पालटते) आहे.