सातारा, ६ जून (वार्ता.) – सातारा शहराला भरपूर प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी कास तलावाची उंची वाढवण्याचे काम गत ४-५ वर्षांपासून चालू होते. ते आता पूर्ण झाले असून तलावाजवळील वाहतुकीसाठीच्या नवीन पुलाचे कामही पूर्णत्वास आले आहे; मात्र धरणातील इतर बाधित झालेल्या रस्त्यांची निर्मिती अद्याप झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होणार असून अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. याविषयी कास आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला; मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. कास, बामणोली, झोंगटी, धावली या परिसरातील नागरीक संतप्त झाले असून प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या सिद्धतेत आहेत.
संपादकीय भूमिकाही स्थिती प्रशासनाच्या लक्षात येत नाही का ? |