वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाणार्‍या महिला हवालदाराची धर्मांधाकडून छेडछाड आणि अरेरावी !

पोलिसांकडून महिला हवालदाराचीच तक्रार घेण्यास टाळाटाळ !

धर्मांधांकडून महिला हवालदाराची छेडछाड

जैताने (जिल्हा धुळे) – येथील निजामपूर भागात एक महिला हवालदार वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी जात असतांना एका धर्मांधाने तिच्या अंगावर खराब पाणी फेकले आणि वरून अरेरावी केली. (उद्दाम धर्मांध ! – संपादक)

विशेष म्हणजे स्वतः महिला हवालदार असूनही या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यानंतर तेथील उपसरपंच आणि गोरक्षक पिंटूभाऊ पगारे अन् शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी पोलिसांना तक्रार घेण्यास भाग पाडले. ‘पोलिसांनी शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा’, अशी मागणी सतीलाल महाराज देवरे आणि साक्री तालुक्यातील ‘सकल हिंदु समाज यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

महिला पोलिसांचीही तक्रार न घेणारे पोलीस सर्वसामान्य हिंदु महिलांची तक्रार कधी घेतील का ? अशांना तात्काळ बडतर्फ करा !