हिंदु मुलींची हत्‍या करणार्‍या लव्‍ह-जिहाद्यांना तात्‍काळ फासावर चढवा ! – कु. वर्षा जेवळे, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’द्वारे ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा करण्‍याची मागणी !

आंदोलनात घोषणा देतांना धर्माभिमानी हिंदू

सोलापूर, ६ जून (वार्ता.) – देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ यांच्‍या हत्‍यांनंतर देशभरात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा होणे आवश्‍यक बनले आहे. यासमवेतच ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना केवळ फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या कु. वर्षा जेवळे यांनी केली. ४ जून या दिवशी चार हुतात्‍मा चौक येथे झालेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त त्‍या बोलत होत्‍या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, श्री. दत्तात्रय पिसे, श्री. मिनेश पुजारे, तसेच सौ. अर्चना सगर यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. या आंदोलनाला मोठ्या संख्‍येने हिंदु धर्माभिमानी उपस्‍थित होते.

या वेळी धर्मप्रेमी श्री. हरीश गायकवाड म्‍हणाले, ‘‘जोपर्यंत ‘लव्‍ह जिहाद’च्‍या प्रकरणी सरकार काही कार्यवाही करत नाही, तोपर्यंत हिंदूंनी त्‍याविषयीच्‍या कठोर कायद्याची मागणी करणे बंद करायला नको. हिंदु मुलींना धर्माचे शिक्षण देणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.’’ या वेळी हातात निषेधाचे फलक धरून आणि निषेधाच्‍या घोषणा देत जागृती करण्‍यात आली.

क्षणचित्र – आंदोलनाच्‍या वेळी रस्‍त्‍यावरून ये-जा करणारे लोक थांबून आंदोलन पहात होते, तसेच स्‍वत:हून निवेदनावर स्‍वाक्षरी करत होते.