इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील बसस्थानकाची लवकरच ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर पुनर्बांधणी ! – प्रकाश आवाडे, आमदार

इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पुनर्बांधणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिंदुजा रुग्णालयात भरती !

२२ मेच्या रात्री प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

पंढरपूर मंदिर आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र यांच्या विकास आराखड्याला शासनाकडून मान्यता !

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंढरपूर मंदिर विकास आराखड्याचे या वेळी सादरीकरण केले. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘त्र्यंबकेश्वर येथे बाहेरून धूप दाखवण्याची प्रथा पाळली गेली पाहिजे !’

नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांशी मी बोललो. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिकांचे म्हणणे आहे की, उरुसाच्या वेळी धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षांची आहे; मात्र ते (उरुसात सहभागी मुसलमान) बाहेरच्या बाहेर जातात. आत जात नाहीत. काही ठिकाणी प्रथा असतात, त्या पाळल्या गेल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २३ मे या दिवशी पत्रकार परिषदेत मांडले.

आपल्यासह कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी !

विविध भ्रमणभाष क्रमांकावरून वानखेडे आणि त्यांची पत्नी यांना धमक्या येत असून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

मूळ समस्या आणि अंतिम उपाय !

हिंदूंच्या समस्यांचे मूलभूत कारण आणि उपाय सांगणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गौरवास्पद !

निधन वार्ता

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या श्रीमती श्रुती भट यांच्या मातोश्री श्रीमती निर्मलाबाई डोरले (वय ९१ वर्षे) यांचे २१ मे या दिवशी मोताळा (जिल्हा बुलढाणा) येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

ही वसुली कधी होणार ?

११ ऑगस्ट २०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात घडवलेल्या दंगलीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रझा अकादमीकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला; पण ११ वर्षांनंतरही ही वसुली झालेली नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रवाद आणि संस्कृती यांविषयीचे विचार भारतातील धर्म, कला आणि भाषा नष्ट करून अस्मितेवर घाला घालणारे मुसलमान अन् ख्रिस्ती आक्रमणकर्ते !

भारतावर मुसलमान आणि इंग्रज यांची आक्रमणे ही केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमणेही होती’, हा मोलाचा सिद्धांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात मांडला.