आपल्यासह कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी !

समीर वानखेडे यांचे मुंबई पोलीस आयुक्तालयाला पत्र !

समीर वानखेडे

मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला दिलेल्या पत्रात स्वतःला आणि पत्नीला जिवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. दक्षिण मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयात हे पत्र पाठवण्यात आले आहे. विविध भ्रमणभाष क्रमांकावरून वानखेडे आणि त्यांची पत्नी यांना धमक्या येत असून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.