अती मात्रेत जेवणे किंवा अती आग्रह करून वाढणे टाळावे !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १९५

अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. आजकाल लग्नसमारंभांचे दिवस असल्याने आवडीचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे घडू शकते. आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे. ‘पाहुण्यांना अती आग्रह करून नको असतांनाही गोडधोड अधिक वाढणे’ हे त्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारण ठरू शकत असल्याने अती आग्रह करून वाढणेही टाळावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan