अजित पवार यांची नसती उठाठेव
मुंबई – नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांशी मी बोललो. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिकांचे म्हणणे आहे की, उरुसाच्या वेळी धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षांची आहे; मात्र ते (उरुसात सहभागी मुसलमान) बाहेरच्या बाहेर जातात. आत जात नाहीत. काही ठिकाणी प्रथा असतात, त्या पाळल्या गेल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २३ मे या दिवशी पत्रकार परिषदेत मांडले. अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘आमच्याकडे कण्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ आम्ही मारुतीरायाला नारळ फोडून करतो; पण तिथे महिलांना गाभार्यात जाण्याची अनुमती नाही. हे चालत आले आहे. कुणी काय पाळावे ?, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण अशा सूत्रांना भावनिक रूप देऊ नका. त्यामध्ये राजकारण आणू नका. जातींमध्ये तेढ निर्माण होईल, असे होता कामा नये. संभाजीनगर, अकोला, शेवगाव आणि त्र्यंबकेश्वर येथे वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली झाल्या. पोलिसांना अन्वेषण करण्यासाठी मोकळीक द्यावी. दंगली नियंत्रित होत नाहीत. गोरगरिबांना त्याची किंमत मोजावी लागते. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे.’’ (धर्मांधांच्या त्र्यंबकेश्वरसारख्या ठिकाणी केलेल्या अरेरावीमुळेच दंगली वाढतात, हे पवार यांनी सांगावे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअनेक मशिदी या पूर्वीची मंदिरेच आहेत, मग तेथीलही प्रथा पाळल्या पाहिजेत, असे पवार मुसलमानांना सांगतील का ? |