पुणे येथील लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात भगवद़्‍गीतेच्‍या १८ अध्‍यायांचे पठण !

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्‍या १२६ व्‍या वर्षी आणि गीता धर्म मंडळाच्‍या शताब्‍दी महोत्‍सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणारे मार्गदर्शन केल्‍याप्रकरणी प.पू. कालीचरण महाराज यांच्‍यासह ५ जणांवर गुन्‍हे नोंद !

सिल्लोड तालुक्‍यातील मोढा बुद्रुक येथे १३ मे या दिवशी आयोजित करण्‍यात आलेल्‍या हिंदु जनजागरण सभेत प.पू. कालीचरण महाराज यांनी हिंदु-मुसलमान समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण केल्‍याच्‍या आरोपावरून, तसेच नियम अन् अटी यांचे पालन न केल्‍याप्रकरणी पोलिसांनी प.पू. कालीचरण महाराज यांच्‍यासह सिल्लोड येथील भाजपचे शहराध्‍यक्ष आणि इतर ४ लोकांविरुद्ध विविध कलमांअंतर्गत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद केला आहे.

नवी मुंबईत नैसर्गिक नालेस्‍वच्‍छतेच्‍या कामांना गती !

पावसाळापूर्व शहरातील नैसर्गिक नालेस्‍वच्‍छतेच्‍या कामांना गती आली आहे, अशी माहिती घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त बाबासाहेब राजळे यांनी दिली.

(म्‍हणे) ‘त्र्यंबक मंदिराला धूप दाखवणार नाही; अन्‍यथा उरुसाची प्रथाच बंद करणार !’

सलीम सय्‍यद यांच्‍या ‘चोराच्‍या उलट्या…!’

धुळे-मनमाड-दादर एक्‍सप्रेसला आणखी ४ डबे जोडणार !

दैनंदिन चाकरमानी, व्‍यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी यांच्‍या मागण्‍या लक्षात घेऊन आता या गाडीस आणखी ४ नवीन डबे जोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

कोल्‍हापुरात समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने वटेश्‍वर मंदिरात महादेवाला अभिषेक !

काही मुसलमानांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात घुसण्‍याचा प्रयत्न केला. याचा निषेध करण्‍यासाठी, तसेच या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्‍यात यावी,

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना !

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार येथील सनातनच्‍या आश्रमात १२ मे २०२३ या दिवशी श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना भावपूर्ण वातावरणात करण्‍यात आली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एस्.टी. बसस्थानक अभियानाला प्रारंभ

१ मे या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एस्.टी. बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

रत्नागिरीत इलेक्ट्रिक एस्.टी. धावणार !  – विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे

सी.एन्.जी. गाड्यांसमवेत आता रत्नागिरी विभागात ४ ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्याही येणार आहेत. या गाड्यांसाठी ‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन’ची जागासुद्धा निश्चित करण्यात येत आहेत. पुढील ४ मासांत या गाड्या येथे येतील .