साधकांमध्ये सेवेचा उत्साह निर्माण करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता शास्त्री (वय ७२ वर्षे) यांनी अनुभवलेली नागपूर येथील ‘हिंदु एकता दिंडी’!

भावस्थितीत राहून केलेली पालखीची सजावट, आनंदाने फुललेले साधकांचे चेहरे, देवतांच्या नामाचा जयघोष आणि दिंडीतील चैतन्य अनुभवून एक हितचिंतक श्री. अश्विन झाले म्हणाले, ‘‘मी आजवर अनेक दिंड्या पाहिल्या; पण ही दिंडी म्हणजे दैवी दिंडी आहे.’’

वर्ष २०२२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवात मानसरित्या विविध रूपे घेऊन अद्वितीय रथोत्सव अनुभवणार्‍या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा होणार असल्याचे मला कळले. तेव्हा त्यात सहभागी होण्याची, त्याची अनुभूती घेण्याची आणि ती अनुभूती आयुष्यभर हृदयात जतन करण्याची माझ्यात तीव्र इच्छा निर्माण झाली.