(म्‍हणे) ‘त्र्यंबक मंदिराला धूप दाखवणार नाही; अन्‍यथा उरुसाची प्रथाच बंद करणार !’

  • सलीम सय्‍यद यांच्‍या ‘चोराच्‍या उलट्या…!’

  • त्र्यंबकेश्‍वर मंदिरात मुसलमानांनी घुसण्‍याचा प्रयत्न केल्‍याचे प्रकरण !

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक

नाशिक – आमच्‍या आजोबांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. त्‍यामुळे आम्‍हीही ही परंपरा जपत आलो आहोत; मात्र असे होईल, असे वाटले नव्‍हते. त्‍यामुळे आता कुठेतरी हे थांबावे असे वाटत आहे. आमच्‍याकडून जर काही चूक झाली असेल, तर राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षमा करावी, अशा शब्‍दांत उरुसाचे आयोजक सलीम सय्‍यद यांनी ढोंगी अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली आणि ‘पुढील वर्षीपासून त्र्यंबकेश्‍वर मंदिराला धूप दाखवणार नाही, अन्‍यथा उरुसाची प्रथाच बंद करू’, असा निर्णय घेतल्‍याचे सांगितले.

त्र्यंबकेश्‍वर येथील घटना प्रकरणी १७ मे या दिवशी नागरिकांच्‍या माध्‍यमातून ग्रामसभेचे आयोजन करण्‍यात आले होते. ग्रामसभेमध्‍ये हिंदु-मुसलमान दोन्‍ही समाजांतील नागरिक उपस्‍थित होते. त्‍या वेळी सय्‍यद यांनी हा निर्णय घेतला. १३ मे या दिवशी झालेल्‍या घटनेनंतर हिंदु महासंघाच्‍या वतीने त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्‍या प्रवेशद्वारावर शुद्धीकरण करण्‍यात आले. या वेळी गोमूत्र शिंपडून हिंदु महासंघाच्‍या पदाधिकार्‍यांकडून जोरदार घोषणा देण्‍यात आल्‍या होत्‍या, त्‍याचसमवेत उरूस आयोजकांपैकी ४ जणांवर गुन्‍हाही नोंद करण्‍यात आला आहे. ढोंगी सलीम सय्‍यद म्‍हणाले की, अशा प्रकारे वातावरण चिघळत असल्‍यास कशाला हवी परंपरा ? ज्‍या समाजात लहानचा मोठा झालो, त्‍यामुळे वाद विवाद नकोत. जशी मिरवणूक निघत होती, तशीच काढू; मात्र त्र्यंबकराजाला धूप दाखवणार नाही. उरूस काढला जातो.  या वेळी वेगळच घडले आहे. त्‍यामुळे नको आता, हे सर्व भीती वाटण्‍यासारखेच आहे.

(हिंदूंनो, अशा नाटकी मुसलमानांचे नाटक आणि षड्‌यंत्र ओळखा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, मुसलमानांचे डावपेच पहा ! जी प्रत्‍यक्ष प्रथाच नाही, ती ‘नाईलाजाने बंद करू’, अशा आविर्भावात बोलणारे मुसलमान ! हिंदूंच्‍या ज्‍योतिर्लिंगांपैकी एक असलेल्‍या महत्त्वाच्‍या तीर्थक्षेत्री अशा प्रकारे घुसखोरी करण्‍याचे धैर्य मुसलमान दाखवतात, हे अतिशय गंभीर आहे. हिंदू याचे गांभीर्य समजणार का ?