संयुक्त शाहूपुरीच्या वतीने भव्य छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहूपुरीत ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेली होर्डिंग

कोल्हापूर, ८ मे (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यांनी धर्मांसाठी केलेला त्याग लोकापर्यंत पोचवण्यासाठी संयुक्त शाहूपुरी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ मे या दिवशी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. १४ मे या दिवशी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मसोहळा होईल, तर दुपारी ३ वाजता भव्य मिरवणूक सोहळा होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सौरभ पोवार, उपाध्यक्ष प्रथमेश मेढे यांसह अन्य पदाधिकारी यांनी दिली.

१. प्रथमच शाहूपुरीतील ४५ मंडळांना एकत्र करून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवासाठी परिसरातील अनेक मंडळे आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे.

२. उत्सवाच्या कालावधीत १३ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन सोहळा, सायंकाळी ६ वाजता मर्दानी खेळ, तर रात्री ७ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव नाट्य होईल.

३. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहूपुरीत ठिकठिकाणी तरुण मंडळे, लोकप्रतिनिधी यांच्याकडून चौकाचौकात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाची होर्डिंग उभारण्यात येत असून शाहूपुरीत हिंदूंच्या संघटितपणाचा अविष्कार पहायला मिळत आहे.