शिवमहापुराण कथास्थळी चोऱ्या करणाऱ्या १० महिलांना अटक !

३२ ग्रॅम सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

चेन चोरणारी महिलांची टोळी

अकोला – येथील पातूर रस्त्यावरील म्हैसपूर येथे चालू असलेल्या शिवमहापुराण कथा, श्रीमद्भागवत कथा यज्ञाच्या ठिकाणी महिला चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. या १० महिलांमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यातील आरोपींचा समावेश आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला ५ मे या दिवशी प्रारंभ झाला. त्यासाठी राज्यातून लाखो महिला भाविक येत आहेत. गर्दीचा अपलाभ घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांची टोळीच सक्रिय झाली आहे.

संपादकीय भूमिका

महिलांचा चोरीसारख्या गुन्ह्यात असणारा पुढाकार हे देशाला लज्जास्पद !