सोयीचा जबाब देण्यासाठी नाशिक पोलिसांकडून अपंग व्यक्तीवर दबाव !

नाशिक – भूमीच्या वादात पोलिसांनी जबाब घेण्यासाठी दोनदा बोलावले. तिसर्‍यांदा जबाब घेतांना तो सोयीनुसार दिला जावा, यासाठी पोलिसांनीच दबाव आणल्याचा प्रकार येथे घडला. तथापि असा जबाब देण्यास नकार दिल्यावर पोलिसांकडून अपंगाच्या साहाय्यासाठी आलेल्या त्याच्या भावावर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याची खोटी तक्रार पोलिसांकडून प्रविष्ट करण्यात आली. राजेश बागुल असे अपंग तक्रारदाराचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

बागुल यांनी त्यांच्या एका भूमीवर अतिक्रमण झाल्याची, तसेच भूमीच्या व्यवहारात वेगवेगळ्या ३ प्रकारची मुखत्यार पत्रे देऊन फसवणूक झाल्याची तक्रार प्रविष्ट केली आहे. त्याविषयी न्यायालयात दावा चालू आहे. बागुल यांच्या विरोधात भूमीच्या मोबदल्यात खंडणीचा गुन्हा नोंद झाल्याने पोलिसांनी त्यांना जबाबासाठी बोलावले. तेव्हा बागुल यांनी न्यायालयीन कागदपत्रे सादर केली; मात्र जबाब घेणार्‍या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील कर्मचार्‍यांनी त्यास नकार देत त्यांच्या मर्जीप्रमाणे जबाब देण्यास सांगितले.

संपादकीय भूमिका

  • नाशिक पोलिसांचा उद्दामपणा आणि असंवेदनशीलता ! अशांना तत्काळ निलंबित करायला हवे !