(म्हणे) ‘संयोगिताराजे छत्रपती खरे बोलत असून महंत खोटे बोलत आहेत !’ -‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांचे विधान

नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुजार्‍यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याचे प्रकरण

छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केलेली पोस्ट

नाशिक – छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केलेली पोस्ट ही अपप्रवृत्तींच्या विरोधात आहे. त्यात कोणतीही चूक नाही. संयोगिताराजे छत्रपती यांचे बोलणे खरे आहे; पण महंत खोटे बोलत आहेत. महंतांना अवाजवी वक्तव्ये करून प्रकाशझोतात रहाण्याची सवय आहे’, असे वक्तव्य ‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांनी केले.

( सौजन्य : टी व्ही ९मराठी )

सामाजिक माध्यमांवर काळाराम मंदिरातील पुजार्‍यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याचे लिखाण संयोगिताराजे यांनी प्रसारित केले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला. यासाठी संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार होते; पण ‘सध्या मंदिरात श्रीरामनवमी उत्सव चालू असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. आमच्या आंदोलनामुळे कुणालाही त्रास होऊ नये, यासाठी आंदोलन मागे घेत आहोत; मात्र संबंधित महंतांनी क्षमा मागावी’, असे पत्रकार परिषदेद्वारे सांगत आंदोलन रहित करण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • धर्माविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना कोण खरे आणि कोण खोटे ? हे ठरवण्याचा अधिकार स्वराज संघटनेला कुणी दिला ?
  • श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदासजी महाराज यांनी केलेला खुलासा नीट वाचून पाहिल्यास सत्य सर्वांच्याच लक्षात येईल !