छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची सशर्त अनुमती !

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने होणार्‍या सभेला पोलिसांनी अनुमती दिली आहे; मात्र त्यासाठी १५ अटी घातल्या आहेत. २ एप्रिल या दिवशी ही सभा होत आहे. २९ मार्चच्या रात्री छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांधांनी दंगल घडवली होती. येथील मराठा सांस्कृतिक मंडळाच्या ठिकाणी ही सभा होणार आहे.

ही सभा सायंकाळी ५ ते रात्री ९.४५ या वेळेतच घ्यावी लागेल. सभेचे ठिकाण आणि वेळेत पालट करू नये. सभेसाठी येणार्‍यांनी आक्षेपार्ह घोषणा, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करू नये. सभेला येतांना शस्त्र बाळगू नये, अशा अटी पोलिसांनी घातल्या आहेत.