नगरमध्ये २ गटांत दगडफेक, पोलिसांचा कडक बंदोबस्त !

घटनास्थळी जमलेले पोलीस

नगर – येथील संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर परिसरात ४ एप्रिलला रात्री किरकोळ कारणावरून २ गटांत दगडफेक झाली आहे. या वेळी समाजकंटकांनी २ मोटारसायकल जाळत, स्विफ्ट या चारचाकीची तोडफोड केली. दगडफेकीत ५ जण घायाळ झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही दगडफेक कोणत्या कारणाने झाली ? हे समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. या प्रकरणी एम्.आय.डी.सी. पोलिसांनी ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा नोंद करत १० ते १२ जणांना कह्यात घेतले आहे. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ‘अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शांतता राखण्यात यावी’, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

ठिकठिकाणी दगडफेक होणे, हे गुन्हेगारांना कायदा-सुव्यवस्थेचे भय नसल्याचे द्योतक ! पोलिसांनी याचा विचार करावा, असेच जनतेला वाटते !