सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये साधकांसाठी ४५ मिनिटांचा ‘उपाय सत्संग’ घेतात. यामध्ये देवीकवच आणि रामकवच (टीप) म्हणून घेतले जाते, तसेच ‘हनुमानाने सूक्ष्मातून मानसदृष्ट काढणे’, हा भावजागृतीचा प्रयोग घेतला जातो आणि शेवटी समष्टी प्रार्थना केली जाते.
टीप – श्रीरामरक्षा स्तोत्रातील ‘शिरो मे राघवः पातु …’पासून ‘सः चिरायुः सुखी पुत्री…’पर्यंतचे श्लोक. यांमध्ये डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयवांचे रक्षण होण्यासाठी श्रीरामाला प्रार्थना केली आहे.
१. सौ. विद्या अविनाश भोईटे, राजारामपुरी, कोल्हापूर.
१ अ. अनिष्ट शक्तीचे आवरण न्यून झाल्यामुळे साधनेविषयीचे कृतीच्या स्तरावरील प्रयत्न करता येणे : ‘सद्गुरु स्वाती खाडये यांच्या ‘उपाय सत्संगा’त सहभागी झाल्यापासून माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण न्यून होत आहे. पूर्वी आवरण वाढल्यामुळे मी बर्याच वेळा साधनेचे प्रयत्न करण्याविषयी नुसता विचार करत होते; पण कृतीच्या स्तरावरील प्रयत्न माझ्याकडून होत नव्हते. आता गुरुदेवांची कृपा आणि उपाय यांमुळे माझ्याकडून कृतीच्या स्तरावरील प्रयत्नही होत आहेत.
१ आ. आता मला कोणत्याही प्रसंगी ताण येत नाही. मला स्थिर रहाता येते.
१ इ. सेवेची तळमळ वाढणे : माझ्या मनात सतत सेवेचेच विचार असतात. मी सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
१ ई. मला गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि सद्गुरु ताई (सद्गुरु स्वाती खाडये) यांची आठवण सतत येत असते.
१ उ. ‘प.पू. गुरुदेव माझ्या समवेत आहेत आणि प्रत्येक सेवा झाल्यावर ते माझ्याकडे बघून हसत आहेत’, असे मला जाणवते.’
२. सौ. सुनीता राजू भोपळे, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर.
अ. ‘सद्गुरु ताईंचा ‘उपाय सत्संग’ चालू झाल्यापासून माझा ४ घंटे नामजप होत आहे.
आ. मी कोणतीही सेवा करण्यासाठी बाहेर पडले, तर ‘ती सेवा गुरुदेव आणि सद्गुरु ताई यांच्या कृपेमुळे होत आहे’, याची जाणीव मला सतत होते.
इ. सत्संगामुळे माझ्यातील सकारात्मकता वाढली आहे, तसेच माझी सेवाही परिपूर्ण होत आहे.’
३. श्री. बाबासाहेब भोपळे, कागल, जिल्हा कोल्हापूर.
३ अ. नामजप वाढणे आणि भ्रूमध्यावर संवेदना जाणवणे : ‘सद्गुरु ताईंचा ‘उपाय सत्संग’ चालू होण्यापूर्वी माझा बसून नामजप अल्प प्रमाणात होत होता. सत्संग चालू झाल्यापासून माझा प्रतिदिन दीड ते २ घंटे बसून नामजप होऊ लागला. माझा जप एकाग्रतेने होतो. बर्याच वेळा मला माझ्या भ्रूमध्यावर संवेदना जाणवते. माझा दिवसभरात जाता-येता आणि बसून, असा एकूण ४ ते ४.३० घंटे नामजप होतो. ‘सतत जप करायचा आहे’, याची मला जाणीव असते.
३ आ. मनावरील ताण न्यून होणे आणि सकारात्मकता वाढणे : पूर्वी काही कारण असो कि नसो, बर्याच वेळा माझ्या मनावर एक प्रकारचा ताण असायचा. सत्संग चालू झाल्यापासून माझ्या मनावरचा ताण न्यून झाला. माझ्या मनाची नकारात्मकता न्यून झाली आणि प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाण्याचे प्रमाण वाढले.’
४. श्रीमती अर्चना विनय करी, राजारामपुरी, कोल्हापूर.
४ अ. ‘सद्गुरु ताईंच्या सत्संगामुळे ‘माझ्या शरिरातील अवयवांची शुद्धी होऊन शरीर फुलाप्रमाणे हलके झाले आहे’, असे मला जाणवते.
४ आ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण होणे : ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून करावेत’, असे मला वाटते. माझी ‘स्वभावदोषांविषयीचे निरीक्षण वाढून ते न्यून व्हावेत’, अशी तळमळ वाढली आहे. या आधी मी प्रत्येक कृतीला भावाची जोड देत नव्हते. आता माझ्याकडून तसे प्रयत्न होतात आणि त्यांत वाढही झाली आहे.’
५. कु. अनिता कल्लाप्पा लोळसुरे (जिज्ञासू), निपाणी, कर्नाटक.
अ. ‘सद्गुरु ताईंच्या ‘उपाय सत्संगा’त सहभागी झाल्यापासून माझे नामजपादी सर्व उपाय भावपूर्ण होतात.
आ. प्रार्थना करतांना मला देवतांचे अस्तित्व जाणवते. स्तोत्र ऐकतांना आणि मंत्रजप करतांना माझे मन लगेच एकाग्र होते. माझ्या मनातील विचार न्यून होऊन माझे मन शांत आणि स्थिर होते.
इ. शेवटी प्रार्थना करतांना मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते आणि माझी पुष्कळ भावजागृती होते.
ई. रविवारी एक दिवस ‘उपाय सत्संगा’त सहभागी झाल्याने माझे प्रतिदिन भावपूर्ण आणि एकाग्रतेने उपाय होतात; तसेच शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास न्यून होऊन नामजप भावपूर्ण होतो. सेवा करतांनाही मला उत्साह आणि चैतन्य जाणवते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १३.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |