स्‍वच्‍छ आणि सुंदर शहर स्‍पर्धेत महाबळेश्‍वर (जिल्‍हा सातारा) नगरपालिका राज्‍यात दुसरी !

महाराष्‍ट्र शासन आयोजित शहर सौंदर्यीकरण आणि स्‍वच्‍छता स्‍पर्धा २०२२ चा निकाल घोषित करण्‍यात आला. यामध्‍ये जिल्‍ह्यातील महाबळेश्‍वर गिरीस्‍थान नगरपालिकेने राज्‍यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

साईबाबा संस्‍थानला अपकीर्त करण्‍यासाठी खोटी पोस्‍ट सामाजिक माध्‍यमावर प्रसारित !

संबंधित सामाजिक प्रसारमाध्‍यमे आणि अपप्रचार करणारे यांवर न्‍यायालयीन कारवाई करणार असल्‍याचे साईबाबा संस्‍थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्‍हटले आहे.

राजकारणी आणि साधक यांच्यातील मूलभूत भेद !

‘राजकारणी स्वार्थामुळे पदासाठी एकमेकांशी भांडतात, तर त्याग केलेले साधक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात एकमेकांशी भांडत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मूळ संभाजीनगर येथील आणि आता गोव्‍यात वास्‍तव्‍यास असलेले श्री. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) सनातनच्‍या १२४ व्‍या संतपदी विराजमान !

मूळ संभाजीनगर येथील आणि सध्‍या फोंडा, गोवा येथे वास्‍तव्‍यास असलेले सनातनचे साधक श्री. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी व्‍यष्‍टी संतपदी विराजमान झाले. त्‍यांच्‍या रूपाने सनातनच्‍या संतांच्‍या मांदियाळीत १२४ वे संतरत्न विराजमान झाले.

गुरुचंद्र मलिगई (चेन्‍नई) येथे तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

‘चाणक्‍य वाहिनी’चे श्री. रंगराज पांडे यांनी श्री. रमेश शिंदे यांची भेट घेऊन ‘हलाल’विषयी विस्‍तृत चर्चा केली. त्‍यांनी श्री. शिंदे यांना संत थिरुवल्लुवर यांची प्रतिमा भेट दिली.

मी गृहमंत्री असेपर्यंत वाळूचा काळाबाजार होऊ देणार नाही !

देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, वाळूचा काळाबाजार रोखण्‍यासाठी राज्‍यात नवे वाळू धोरण लागू करत आहोत. नव्‍या धोरणानुसार वाळूचे उत्‍खनन करणारी आणि वाळू विकणारी एकच व्‍यक्‍ती नसेल.

‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार सोहळ्‍यातील मृत्‍यूंची उच्‍चस्‍तरीय चौकशी करा !

खारघर येथे झालेल्‍या ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार वितरण सोहळ्‍याला उपस्‍थित भाविकांतील १४ जणांचा मृत्‍यू झाला होता. याचे अन्‍वेषण करण्‍यासाठी सरकारने एक समिती गठीत केली आहे.