वक्‍फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

‘गडहिंग्‍लज येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

आंदोलनात सहभागी हिंदुत्‍वनिष्‍ठ, राष्‍ट्रप्रेमी

गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) – ‘वक्‍फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करावा, या मागणीसाठी १९ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्‍थानकाशेजारी हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्‍य शास्‍त्री आणि सौ. विजया वेसणेकर यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले.

या प्रसंगी गडहिंग्‍लजचे भाजपचे विस्‍तारक श्री. संदीप नाथबुवा, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी श्री. मनोज पोवार, शिवसेनेचे श्री. सागर कुराडे, जगद़्‍गुरु श्री नरेंद्र महाराज संप्रदायचे श्री. गंगाधर जमदाडे, माजी फौजदार श्री. पांडुरंग चौगुले, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री. शिवाजी माने यांसह विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्‍थित होते. आंदोलन झाल्‍यावर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्‍यात आले.

विशेष 

मोठ्या प्रमाणात ऊन असूनही हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते, राष्‍ट्रप्रेमी आंदोलनासाठी उपस्‍थित होते.