पुणे जिल्ह्यातील १२ प्राथमिक शाळा अनधिकृत !
पुणे- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. शासनाची मान्यता न घेता, कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा चालवल्या जात असल्याची प्रकरणे गेल्या काही काळात समोर आली. त्यामुळे शिक्षण अधिकार्यांनी सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी घोषित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १२ अनधिकृत शाळा असून सर्वाधिक ४ शाळा हवेली तालुक्यात आहेत. (एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा अनधिकृतपणे चालू कशा झाल्या ? याकडे कुणाचेच लक्ष का नाही, हेही शोधायला हवे ! – संपादक) अनधिकृत शाळा पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील आहेत. संबंधित शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.