|
पाटण (गुजरात) – येथील रोटलिया हनुमान मंदिरात प्रसिद्ध लोकगायक कीर्तीदान गढवी यांच्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी १ ते १० भाकर्या आणण्याचे तिकीट ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे ५० सहस्रांहून अधिक भाकर्या जमा झाल्या.
Interesting Video: ऐसी भजन संघ्या आजतक नहीं देखी होगी, 10 रोटी खरीदने पर मिली एंट्री, नोटों के साथ बरस पड़ीं रोटियां https://t.co/FjyxvSUjUu #KirtidanGarhvi #uniquefolkdiara
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) April 18, 2023
या भाकर्या गाय, श्वान आणि अन्य पशू अन् प्राणी यांना देण्यात आल्या.
(सौजन्य : News18 Gujarati)
या मंदिराच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या मंदिरातही प्रसादाच्या रूपात भाकर्याच वाटल्या जातात. देवालाही भाकर्यांचाच नैवेद्य दाखवला जातो.