शुल्‍क भरले नाही म्‍हणून निकाल रोखल्‍यास शाळांवर कारवाई करणार ! – शिक्षण विभाग

पुणे – परीक्षेचे निकाल घोषित झाल्‍यानंतर शाळेचे थकित शैक्षणिक शुल्‍क भरले नसल्‍यास निकाल देणार नाही, तसेच पुढील वर्गात प्रवेशही मिळणार नाही, अशा प्रकारे सांगून काही शाळा विद्यार्थी आणि पालकांना भीती दाखवत आहेत. अशा प्रकारची अडवणूक शाळांना करता येणार नाही, अन्‍यथा शिक्षण अधिकार्‍यांच्‍या साहाय्‍याने त्‍यांच्‍यावर कारवाई करणार असल्‍याची चेतावणी शिक्षण विभागाने दिली आहे.