ठाणे, १९ एप्रिल (वार्ता.) – रशियाची गुप्तचर संस्था ‘के.जी.बी.’ आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सी.आय.ए.’ यांच्यासह भारतातील काही घटकांनी मिळून लालबहाद्दूर शास्त्री यांचा मृत्यू घडवून आणला, असा आरोप लेखक पंकज कालुवाला यांनी केला. नौपाडा येथील हितवर्धिनी सभेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाच्या वतीने ‘लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राजकीय हत्या आणि विविध गुप्तचर यंत्रणा यांवर पुस्तके लिहिणारे पंकज कालुवाला यांची ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळे यांनी मुलाखत घेतली. या वेळी पंकज कालुवाला यांनी वरील आरोप केला.
याविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना पंकज कालुवाला म्हणाले, ‘‘लालबहाद्दूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूची कोणतीही ‘फाईल’ सिद्ध करण्यात आलेली नाही. जे काही लिखित दस्तावेज आहेत, ते अतिशय अल्प स्वरूपात आहेत. रशियाच्या गुप्तचर संघटनेचा एक हस्तक भारताच्या मंत्रीमंडळात होता, अशी एक धारणा आहे. मोरारजी देसाई यांच्याविषयी असे बोलले जाते; परंतु आपल्याकडे अशा स्वरूपाच्या आरोपांचे अन्वेषण केले जात नाही. भारताच्या मंत्रीमंडळात रशियाचा गुप्तचर संघटनेचा हस्तक कोण होता ? हे निश्चितपणे सांगता येणार नाही.’’
संपादकीय भूमिकापंतप्रधान लाल बहाद्दूरशास्त्री यांचा मृत्यू संशयास्पदरित्या होऊनही त्याविषयीच्या घडामोडी भारतियांपुढे न येणे, यातून तत्कालीन काँग्रेसच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते ! |