शिरगाव (पुणे) येथील सरपंचांचा कोयत्याने वार करून खून !

भूमीच्या वादातून ही घटना घडली आहे. प्रवीण गोपाळे हे विद्यमान सरपंच म्हणून काही दिवसांपूर्वीच निवडून आले होते.

वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे मलब्याचा ढिगारा ढासळल्याने ३ कामगारांचा मृत्यू !

जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील झोलेगाव शिवारात विहिरीचे काम चालू असतांना विहिरीलगत असलेला मलब्याचा ढिगारा ढासळल्याने त्याखाली दबून ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे

साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी धीरेंद्रशास्त्री यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला नाही. जबलपूर येथे एका भाविकांनी साईबाबा यांची पूजा केली पाहिजे कि नाही ?

एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त !

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

सोलापूर शहरातील पाणीपुरवठा किमान ३ दिवसाआड करण्याचा प्रयत्न ! – संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त

सध्या शहरात ४ ते ५ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काही मासांमध्ये शहरात किमान ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असेल. शहराची लोकसंख्या वाढली असल्याने २६ नवीन पाण्याच्या टाक्या बसवण्याचे नियोजन आहे.

पाकिस्तान सरकारकडून न्यायाधिशांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न !

‘तुम्ही संसदेत गेलात, तर असे लोक तिथे संसदेला संबोधित करतांना दिसतील, जे कालपर्यंत कारागृहात होते आणि जे देशद्रोही आहेत.’ – सरन्यायाधीश उमर अता बंदियाल

पुण्यातील बडी दर्ग्याजवळ नारायणेश्‍वर मंदिराचे अवशेष सापडले !

नारायणेश्‍वर मंदिर तोडून तेथे दर्गा बांधल्याचे हिंदू सांगत होते. या अवशेषांमुळे त्याला पुष्टी मिळाली आहे. या सर्व अवशेषांचा तात्काळ अभ्यास करून बडी दर्ग्याचे सत्य समाजासमोर आणणे आवश्यक !

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे अज्ञातांकडून श्रीगणेशाच्या मूर्तीची तोडफोड !

आंध्रप्रदेशात सातत्याने हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात असतांना राज्यातील ख्रिस्ती मुख्यमंत्री असलेल्या वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारकडून कारवाई होतांना दिसत नाही, याविषयी स्वतःला कायदाप्रेमी, राज्यघटनेचे रक्षक म्हणवून घेणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बंगालची पीडा लवकरच संपवू ! – राज्यपाल आनंद बोस

हुगळी येथे पुन्हा झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आम्ही समाजकंटकांना कायदा हातात घेऊ देणार नाही. अशांवरही पोलीस कठोर कारवाई करतील. बंगाल दीर्घ काळापासून अशा घटना झेलत आहे.

डोंबिवली येथे कोयता टोळीचा वृद्ध दांपत्याच्या घरात घुसून धुडगूस !

यावरून गुंडांना कायद्याचे जराही भर उरले नसल्याचे सिद्ध होते ! पोलिसांना हे लज्जास्पद !