संगमवाडी नदीपात्रात सापडले शिवपिंड
(दर्गा म्हणजे मुसलमानाच्या थडग्याच्या भोवती केलेले बांधकाम)
पुणे – येथील नदीपात्राजवळ ज्या ठिकाणी बडी दर्गा आहे, त्या ठिकाणी स्वच्छता चालू असतांना नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडल्याची माहिती इतिहास अभ्यासकांनी दिली आहे. पुणे महापालिकेकडून येथे सध्या नदीसुधार प्रकल्पाचे काम चालू आहे. याचे काम चालू असतांना पुण्यातील संगमवाडी नदी पात्रात महादेवाची पिंडीसह इंग्रजकालीन पिस्तूलही सापडले आहे. ही ऐतिहासिक पिंड सापडल्याने ती पुरातत्व विभागाकडे सुपुर्द करण्यात आली आहे. बडी दर्गा आणि छोटी दर्गा या दोन्ही ठिकाणी पुणेश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे असल्याचे सांगितले जात आहे.
इतिहास अभ्यासक नंदकिशोर एकबोटे यांनी सांगितले की, नारायणेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्या, मध्यभागी असलेले प्रवेशद्वार, कोरीव कमान आणि समाधी स्थान सापडले आहे. समाधी स्थान त्याच्या भोवती असलेला परीसर हा पुरातत्वीय अवशेषांकडे घेऊन जातो. येथे पुरातन अवशेष सापडल्याने स्वच्छता कामगारांनी काम थांबवले आहे. ३ एप्रिल या दिवशी कामगारांना त्या ठिकाणी मोठे नाग दिसले. आता येथे नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडल्याने ही जागा सुरक्षित व्हावी, असे सर्वांचे मत आहे.
संपादकीय भूमिकानारायणेश्वर मंदिर तोडून तेथे दर्गा बांधल्याचे हिंदू सांगत होते. या अवशेषांमुळे त्याला पुष्टी मिळाली आहे. या सर्व अवशेषांचा तात्काळ अभ्यास करून बडी दर्ग्याचे सत्य समाजासमोर आणणे आवश्यक ! |