शिरगाव (पुणे) येथील सरपंचांचा कोयत्याने वार करून खून !

शिरगाव – मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत येथे सरपंच प्रवीण गोपाळे (वय ४७ वर्षे) यांचा अज्ञात आक्रमणकर्त्यांनी भर चौकात कोयत्याने आक्रमण करून खून केला. भूमीच्या वादातून ही घटना घडली आहे. प्रवीण गोपाळे हे विद्यमान सरपंच म्हणून काही दिवसांपूर्वीच निवडून आले होते. ते दुचाकीवरून शिरगाव चौकात कामानिमित्त आले असतांना त्यांच्यावर आक्रमण केले आहे. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.