साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी धीरेंद्रशास्त्री यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

मुंबई – साईबाबा यांच्याविषयी केलेल्या विवादित विधानावरून युवासेनेने धीरेंद्रशास्त्री महाराज यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साईबाबांच्या भक्तांच्या भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्रशास्त्री महाराज यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला नाही. जबलपूर येथे एका भाविकांनी साईबाबा यांची पूजा केली पाहिजे कि नाही ? असा प्रश्न विचारला असता त्यावर धीरेंद्रशास्त्री महाराज यांनी ‘लांडग्याचे कातडे पांघरून कुणी सिंह होत नाही’, असे विधान केले होते.