क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या नातेवाइकांची हत्या करणारा राशिद पोलीस चकमकीत ठार !

क्रिकेटपटू सुरेश रैना यांची आत्या आणि काका यांची हत्या करण्यासमवेत अन्य गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या राशिद नावाच्या आरोपीला पोलिसांनी येथे झालेल्या एका चकमकीत ठार केले.

देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र ८२४ रुग्ण आढळले

देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र रुग्ण आढळले असून मागील १८४ दिवसांतील हा उच्चांक आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ सहस्र ३८९ एवढी झाली आहे.

देशातील हिंदू आता जागृत झाला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई आणि ठाणे येथे २ एप्रिल या दिवशी गौरव यात्रा काढण्यात आली. दादर येथे उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

मुंबईत येत्या १५ दिवसांत उष्णतेची लाट !

एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी यात्रेचे आयोजन ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि प्रखर हिंदुत्ववाद, म्हणजे प्रत्येक देशवासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य ! – आमदार टी. राजासिंह

श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या वेळी टी. राजासिंह यांनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याविषयी ते बोलत होते.

मध्यप्रदेश सरकारने नसरुल्लागंजचे नाव पालटून केले भैरूंदा !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील नसरुल्लागंज शहराचे नाव पालटून भैरूंदा केले आहे. याविषयीची सूचना सरकारकडून प्रसारित करण्यात आली आहे.

इटलीमध्ये संभाषणासाठी इंग्रजी आणि अन्य विदेशी भाषांवर बंदी घालण्यात येणार !

इटली सरकार लवकरच देशात इंग्रजी भाषेच्या वापरावर बंदी घालणार आहे.जर कुणी विदेश भाषांमध्ये संभाषण केले किंवा त्याचा वापर केला, तर त्याला दंड भरावा लागणार आहे.

अमेरिकेतील चक्रीवादळात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू

३१ मार्च आणि १ एप्रिल या दिवशी हे चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळामुळे असंख्य लोकांची घरे उद्ध्वस्त झाली.