सासवड (पुणे) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे हिंदूंची एकमुखी मागणी !
सासवड (जिल्हा पुणे), २७ मार्च (वार्ता.) – ३ मार्च २०२३ पासून मोगलांचे उदात्तीकरण करणारी ‘ताज : डिव्हायडेड बाय लव्ह’ ही वेब सिरीज झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालू आहे. या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्याचार करणार्या क्रूर अकबर आणि त्याच्या परिवाराचे म्हणजेच मोगलांचे उदात्तीकरण केले जात आहे. ज्या मोघलांनी हिंदु धर्म संपवण्याचा, हिंदूंचा वंशविच्छेद करण्याचा प्रयत्न केला अशा मोघलांवर वेब सिरिज काढणे, म्हणजे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे वेब सिरीजवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे येथे करण्यात आली. सासवड नगरपालिकेसमोर झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी ‘समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरणार्या अशा वेब सिरीजचे निर्माते, मोगलांचे समर्थन करणारे कलाकार यांच्यावर कारवाई करावी’ अशीही मागणी या वेळी केली.
या आंदोलनात ७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे कार्यप्रमुख श्री. सुरज भगत आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. ऋषिकेश कामथे, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी मार्गदर्शन केले. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे संस्थापक श्री. पंडित दादा मोडक, तसेच रणसंग्राम ग्रुपचे श्री. राहुल कदम हेही उपस्थित होते.
मोगलांचे उदात्तीकरण करणार्या अशा वेब सिरीजवर हिंदूंनी बहिष्कार घालावा ! – सुरज भगत, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा
पूर्वीच्या पाठ्यपुस्तकातून मोगलांचे उदात्तीकरण केले जात होते. अकबर, बाबर किती महान होते, हे शिक्षणातून मुलांच्या मनावर बिंबवले जायचे; पण आता हिंदू जागृत होत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा चित्रपट आणि वेब सिरीज या माध्यमातून मोगलांचे उदात्तीकरण केले जात आहे. जर अकबर, बाबर महान होते, तर आपली मंदिरे त्यांनी का उद्ध्वस्त केली, ज्या गायीला आपण पवित्र मानतो त्या गोमातेची हत्या या लांड्यांनी का केली ? याचाही विचार प्रत्येक हिंदूंनी केला पाहिजे. त्यामुळेच मोगलांचे उदात्तीकरण करणार्या अशा वेब सिरीजवर हिदूंनी बहिष्कार घालावा !
हिंदु संस्कृती संपवण्याचे मोठे षड्यंत्र या माध्यमातून रचले जात आहे ! – ऋषिकेश कामथे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
वेब सिरीजच्या माध्यमातून हिंदु संस्कृती, इतिहास नष्ट करण्यात येत आहे. अश्लीलता पसरवण्यात येत आहे. हिंदु संस्कृती संपवण्याचे मोठे षड्यंत्र या माध्यमातून रचले जात आहे त्यामुळे याला हिंदूंनी बळी पडू नये, असे आवाहन या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. ऋषिकेश कामथे यांनी केले.
अकबराचे उदात्तीकरण करणे हे पराक्रमी हिंदु राजांचा अपमान करण्यासारखे आहे ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
आंदोलनानंतर झालेल्या मार्गदर्शनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले म्हणाले की, ज्यांनी भारतभूमीतून हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशा अकबराला ‘सहिष्णू’, ‘सर्वधर्मसमभावी’, ‘आध्यात्मिक’ आदी विशेषणे लावून त्याचा खोटा इतिहास प्रचारित केला जात आहे. अशाप्रकारे वेब सिरीज बनवून मोगलांचे उदात्तीकरण करणे, हे हिंदु राजांनी शेकडो वर्षे या भारतभूमीमध्ये युद्ध करून हिंदु भूमी जिवंत ठेवली, त्यांचा अपमान करण्यासारखे आहे.
वेब सिरीजच्या माध्यमातून मोगलांचे उदात्तीकरण करणे हे पुष्कळ मोठे षड्यंत्र आहे – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा
हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी सांगितले की, या वेब सिरीजमध्ये अकबर सहिष्णू होता, ग्रेट होता, सम्राट होता, असे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्याचा इतिहास क्रूर होता. ज्या अकबराने सहस्रो हिंदूंचा शिरच्छेद केला, शेकडो मंदिरे उद़्ध्वस्त केली, हिंदूंचे धर्मांतर केले, हिंदु स्त्रियांवर अत्याचार करत त्यांना विकण्यात आले, अशा मोगलांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे.
जोधाबाईनाही या अकबराने फसवून त्यांचे अपहरण केले, त्यांचे धर्मांतर केले. हा सत्य इतिहास असतांना या वेब सिरीजच्या माध्यमातून आणि आजपर्यंतच्या बॉलिवूड मधील असंख्य चित्रपटामधून जोधा अकबर यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. यामुळे आज हिंदु मुली या लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत, हे पुष्कळ मोठे षड्यंत्र आहे, तसेच या वेब सिरीजमध्ये अकबराची भूमिका साकारणारे अभिनेता नासिरूद्दीन शाह यांनी उघडपणे पत्रकार परिषदेत मोगलांविषयी कौतुकोद्गार काढून त्यांच्या क्रूरतेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शाह यांच्यासारख्या मोगलप्रेमी कलाकारांवरही कारवाई व्हायला हवी.