गुढीपाडव्याला कडूनिंबाच्या पानांची चटणी का खातात ?
कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात. कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.