रामनाथी येथे झालेल्या भाच्याच्या (श्री. अतुल बधाले यांच्या) विवाहाच्या वेळी सौ. सुवर्णा रागमहाले यांना जाणवलेली सूत्रे

‘२८.११.२०२२ या दिवशी माझा भाचा श्री. अतुल बधाले याच्या विवाहाच्या निमित्ताने मला रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. या आनंदमय सोहळ्याच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे मी गुरुचरणी अर्पण करत आहे.

श्री. अतुल बधाले

१. मी तळेगाव दाभाडे (पुणे) येथून रामनाथी आश्रमात विवाहासाठी जात होते. तेव्हा ‘या विवाहाच्या निमित्ताने मला रामनाथी आश्रमातील चैतन्याचा लाभ घेता येणार आहे’, असा माझा भाव होता.

२. विवाह सोहळ्याच्या सेवेत सहभागी असणारे साधक प्रत्येक कृती शांतपणे, भावपूर्ण, परिपूर्ण आणि आनंदाने करत होते. त्या वेळी मला प्रत्येक साधकाच्या रूपात गुरुदेवांना अनुभवता आले.

३. संतांच्या सत्संगानंतर साधनेच्या विचारांत वाढ होणे

सौ. सुवर्णा रागमहाले

रामनाथी आश्रमात गेल्यावर मला संतांच्या सत्संग लाभला. तेव्हापासून माझ्या मनातील सेवा आणि साधना यांविषयीचे विचार वाढले. आता मला गावी शेतीची कामे करायला जावे लागले, तरी वेळ मिळताच मी सेवा करण्याचे नियोजन करते. रामनाथी आश्रमातून घरी आल्यापासून ‘साधनाच करायची आहे आणि बाकी काही नको’, असे मला वाटत आहे.

४. घरी कुलाचाराप्रमाणे सर्व कृती करतांना आनंद अनुभवता येणे

विवाहानंतर सर्व जण आमच्या घरी आले होते. घरी आल्यावर नवरा-नवरीचे (श्री. अतुल बधाले आणि सौ. आनंदी अतुल बधाले यांचे) औक्षण करतांना ‘माझ्याच घरात लग्न झाले आहे. नवरा-नवरी घरात येत आहे अन् मी त्यांचे औक्षण करत आहे’, असा आनंद मला अनुभवता आला. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला आमच्या घरी कुलाचाराप्रमाणे सर्व कृती करतांना आनंद अनुभवता आला.’

– सौ. सुवर्णा रागमहाले (वय ५२ वर्षे), तळेगाव, पुणे. (२०.२.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक