निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६६
‘गुढीपाडवा वसंत ऋतूमध्ये येतो. या ऋतूमध्ये कफाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. कफ म्हणजे पृथ्वी आणि आप महाभूते. या दिवशी कडूनिंबाच्या पानांची चटणी बनवून खातात. कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात.
कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)
♦ आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ! ♦
bit.ly/ayusanatan