
रत्नागिरी – येथील नगरपरिषदेने माळनाका येथे उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या प्रवेशद्वारावर रत्नागिरी नगरपरिषदेचा कुठेही उल्लेख नाही, तसेच तारांगणाचे विज्ञापन करणारे जे फलक रत्नागिरी शहरात लावण्यात आले आहेत, त्या फलकांवरही रत्नागिरी नगरपरिषदेचा उल्लेख नाही. त्यामुळे जाणूनबुजून रत्नागिरी नगरपरिषदेचा उल्लेख टाळण्यात आला आहे का, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांनी केला आणि ‘रत्नागिरी नगरपरिषदेने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
डिसेंबर मासात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाजावाजा करून तारांगणचे उद्घाटन करण्यात आले, तसेच शहरामध्ये तारांगणाच्या विज्ञापनांचे फलक लावण्यात आले होते. आज तारांगणमध्ये रत्नागिरी नगरपरिषदेचे कर्मचारी काम करत आहेत; मात्र अद्यापही मुख्याधिकार्यांच्या निदर्शनास वरील गोष्ट का आली नाही ? असा प्रश्न सुदेश मयेकर यांनी केला.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !